गंगापूर, (प्रतिनिधी): गंगापूर वकील संघातर्फे न्यायालयात ई-फायलिंग प्रणालीबाबत महत्त्वाचे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डिजिटल न्यायप्रणालीकडे वाटचाल करताना वकिलांसाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
गंगापूर वकील संघातर्फे रविवारी दुपारी बारा वाजता ई-फायलिंग ट्रेनिंगचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये न्यायालयीन कामकाजात ई-फायलिंग कशी करावी, त्याचे नियम, प्रक्रिया तसेच येणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शन करण्यात आले.
मार्गदर्शन करताना मान्यवर या प्रसंगी माननीय जिल्हा न्यायाधीश एस. बी. बहाळकर, तसेच एम. ए. शेख आणि ए. ए. कळमकर यांनी वकिलांना कायदेविषयक विविध मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले. डिजिटल प्रणालीचा अधिकाधिक वापर करून न्यायप्रक्रिया सुलभ व गतिमान करण्याचे आवाहनही त्यांनी केले. या प्रशिक्षण कार्यक्रमाला गंगापूर वकील संघाचे अध्यक्ष व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. ई-फायलिंगमुळे वेळेची बचत होऊन कामकाज अधिक पारदर्शक होईल, अशी प्रतिक्रिया उपस्थित वकिलांनी व्यक्त केली.
डिजिटल युगात न्यायालयीन कामकाज अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने गंगापूर वकील संघाचा हा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण ठरत आहे. यावेळी वकिल संघाचे अध्यक्ष अॅड. किशोर क-हाळे, उपाध्यक्ष अॅड. अमोल ठाकुर, सचिव अॅड. विठ्ठल काळे, अॅड. शिवप्रसाद बन्सोड यांच्यासह अॅड. बी. आर. अँड अफ्तापा शेख, राजपूत, पी. बी. जोशी, व्ही. एस. मनोरकर, एस. के. नरोडे, ए. बी. कुलकर्णी, डी. व्ही. साबणे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच शहरातील कायदेविषयक क्षेत्रातील व समाजकार्यात आघाडीवर असलेल्या अनेक वकील उपस्थित होते.















